वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश – संत निवृत्तीनाथ अभंग
वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश ।
आकशअवकाश धरी आम्हा ॥१॥
तें रूप सुघड प्रत्यक्ष उघड ।
गौळियासी कोड कृष्णरूप ॥२॥
न दिसे निवासा आपरूपें दिशा ।
सर्वत्र महेशा आपरूपें ॥३॥
तारक प्रसिद्ध तीर्थ पै आगाध ।
नामाचा उद्धोध नंदाघरीं ॥४॥
प्रकाशपूर्णता आदिमध्य सत्ता ।
नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥५॥
निवृत्तिसाधन कृष्णरूपें खुण ।
विश्वीं विश्वपूर्ण हरि माझा ॥६॥
वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश – संत निवृत्तीनाथ अभंग