वैकुंठ दुभतें नंदाघरीं माये – संत निवृत्तीनाथ अभंग
वैकुंठ दुभतें नंदाघरीं माये ।
तें पुण्य पान्हा ये यशोदेसी ॥१॥
तें रूप रूपस कांसवी प्रकाश ।
योगीजनमानस निवताती ॥२॥
सुंदर सुनीळ राजस गोपाळ ।
भक्तीसी दयाळ एक्या नामे ॥३॥
निवृत्ति गयनी मन ते चरणीं ।
अखंडता ध्यानीं तल्लीनता ॥४॥
वैकुंठ दुभतें नंदाघरीं माये – संत निवृत्तीनाथ अभंग