उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप – संत निवृत्तीनाथ अभंग
उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप ।
नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥
तें रूप विनट विठ्ठल सकळ ।
सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥
रजतमें दूरी नामाची माधुरी ।
निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥
भवाब्धितारक नावाडा विवेक ।
पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥
विश्व हें तारिलें नामचि पिकलें ।
केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥
निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ ।
दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥
उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप – संत निवृत्तीनाथ अभंग