उफराटी माळ उफराटें – संत निवृत्तीनाथ अभंग
उफराटी माळ उफराटें ध्यान ।
मनाचें उन्मन मूर्ति माझी ॥ १ ॥
तें रूप आवडे भोगिता साबडें ।
यशोदेसि कोंडें बुझावितु ॥ २ ॥
नहोनि परिमाण हरपलें ध्यान ।
आपणचि रामकृष्ण जाला ॥ ३ ॥
निवृत्तिची जपमाळा हे गोमटी ।
मन तें वैकुंठी ठेवियेलें ॥ ४ ॥
उफराटी माळ उफराटें – संत निवृत्तीनाथ अभंग