तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला – संत निवृत्तीनाथ अभंग
तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला ।
मुक्ताई लाधला प्रेमकवळु ॥ १ ॥
चांगयाचे मुखीं घालीत कवळू ।
आपण गोपाळु दयासिंधु ॥ २ ॥
दिधलें तें तूं घेई पूर्ण तें होई ।
सप्रेमाचे डोही संतजन ॥ ३ ॥
नामया विठया नारया लाधलें ।
गोणाई फावलें अखंडित ॥ ४ ॥
राही रखुमाई कुरवंडी करिती ।
जिवें वोंवाळिती नामयासी ॥ ५ ॥
निवृत्ति खेंचर ज्ञानदेव हरि ।
सोपान झडकरी बोलाविला ॥ ६ ॥
तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला – संत निवृत्तीनाथ अभंग