तारक प्रसिद्ध तीर्थ तें – संत निवृत्तीनाथ अभंग

तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध ।
नामाचा उद्बोध नंदाघरी ॥ १ ॥
प्रकाश पूर्णता आदिमध्यें सत्ता ।
नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥ २ ॥
निवृत्ति साधन कृष्णरूपें सुख ।
विश्वीं विश्वरूप हरि माझा ॥ ३ ॥

तारक प्रसिद्ध तीर्थ तें – संत निवृत्तीनाथ अभंग