स्थिर धीर निर सविचारसार – संत निवृत्तीनाथ अभंग


स्थिर धीर निर सविचारसार ।
ब्रह्मांड आगर गोपवेषें ॥ १ ॥
तो हा कृष्ण सखा नंदाघरीं देखा ।
यशोदे सन्मुखा दूध मागे ॥ २ ॥
कळिकाळ कळिता काळ आकळिता ।
आपण स्वसत्ता विश्व हरी ॥ ३ ॥
निवृत्ति निकट ज्ञानदेव धीट ।
खेचरासि वाट गुरुनामें ॥ ४ ॥


स्थिर धीर निर सविचारसार – संत निवृत्तीनाथ अभंग