सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे – संत निवृत्तीनाथ अभंग


सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे ।
प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥ १ ॥
विरालें ते ध्येय ध्यान गेलें मनीं ।
मनाची उन्मनि एक जाली ॥ २ ॥
ठेला अहंभाव सर्व दिसे देव ।
निःसंदेह भाव नाहीं आम्हां ॥ ३ ॥
निवृत्ति साधन गयनिप्रसादें ।
सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥ ४ ॥


सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे – संत निवृत्तीनाथ अभंग