रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष – संत निवृत्तीनाथ अभंग
रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष ।
पंढरीनिवास आत्माराम ॥ १ ॥
पुंडलिकभाग्य वोळलें संपूर्ण ।
दिननिशीं कीर्तन विठ्ठल हरी ॥ २ ॥
त्रैलोक्य उद्धरे ऐसी पव्हे त्वरे ।
कीर्तन निर्धारे तरुणोपाव ॥ ३ ॥
पूण्य केलें चोख तारिले अशेख ।
जनीं वनीं एकरूप वसे ॥ ४ ॥
वेदादिकमति ज्या रूपा गुंतती ।
तो आणूनी श्रीपति उभा केला ॥ ५ ॥
निवृत्तीचा सखा विठ्ठलरूप देखा ।
निरालंब शिखा गगनोदरीं ॥ ६ ॥