रसज्ञ रसाचार रसामाजी वसे – संत निवृत्तीनाथ अभंग
रसज्ञ रसाचार रसामाजी वसे ।
जीवन हें सोसे असोस होय ॥१॥
तें रूप स्वरूपाचें रूपींच वोळले ।
कंदर्पें घोळिले नंदाघरीं ॥२॥
नाहीं त्या आकार अवघाचि वैकुंठ ।
अद्वैत घनदाट ब्रह्ममय ॥३॥
निवृत्ति नितंब कृष्ण तो स्वयंभ ।
श्रीमूर्तीचे बिंब दिसे सर्व ॥४॥
रसज्ञ रसाचार रसामाजी वसे – संत निवृत्तीनाथ अभंग