पूर्णबोधें धाले आत्मराम धाले – संत निवृत्तीनाथ अभंग


पूर्णबोधें धाले आत्मराम धाले ।
निखळ वोतले पूर्णतत्त्वें ॥ १ ॥
पूर्वपूण्य चोख आम्हांसि सफळ ।
गयनि कल्लोळ तुषार आम्हां ॥ २ ॥
चंद्र सूर्य कीर्ण आकाश प्रावर्ण ।
पृथ्वी अंथुरण सर्वकाळ ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु धडफुडा ।
ब्रह्मांडा एवढा अनंत माझा ॥ ४ ॥


पूर्णबोधें धाले आत्मराम धाले – संत निवृत्तीनाथ अभंग