पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट – संत निवृत्तीनाथ अभंग


पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट ।
करिती बोभाट हरिनामाचा ॥ १ ॥
वाळलें अंबर अमृततुषार ।
झेलीत अमर चकोर झाले ॥ २ ॥
देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाठे ।
पंढरीये पेठे प्रेमपिसे ॥ ३ ॥
निवृत्ति निर्वाळिला ज्ञानदेव सोपान ।
खेचर तल्लीन वीनटला ॥ ४ ॥


पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट – संत निवृत्तीनाथ अभंग