प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर – संत निवृत्तीनाथ अभंग


प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर ।
ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥१ ॥
तें रूप भीवरें पांडुरंग खरें ।
पुंडलिकनिर्धारें उभे असें ॥ २ ॥
युगे अठ्ठावीस उभा ह्रषीकेश ।
पुंडलिका सौरस पुरवित ॥ ३ ॥
निवृत्तीचें गुज पांडुरंगाबीज ।
विश्वजनकाज पुरे कोडें ॥ ४ ॥