पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी – संत निवृत्तीनाथ अभंग
पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी ।
विष्णु चराचरीं ग्रंथीं पाहे ॥ १ ॥
तें रूप विठ्ठ्ल ब्रह्माकार दिसे ।
पंढरी सौरस भींमातीरीं ॥ २ ॥
जगाचे तारक पूण्य पूज्य लोका ।
तृप्त सनकादिक नामें होती ॥ ३ ॥
पतीतपावन नाम हे जीवन ।
योगीयाचें ध्यान हरि आम्हां ॥ ४ ॥
वेणुनादीं काला पिंडावती जाला ।
भाग्य भोगियला दृष्टी पूढें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे ते रूपडें अनंत ।
विठ्ठल संकेत तरुणोपेव ॥ ६ ॥
जनासी तारक विठ्ठलचि एक – संत निवृत्तीनाथ अभंग