परेसि परता न कळे पैं – संत निवृत्तीनाथ अभंग
परेसि परता न कळे पैं शेषा ।
तो गौळिया अशेषा माजी हरी ॥ १ ॥
भाग्य पैं फळलें नंदाघरीं सये ।
यशोदा पैं माय परब्रह्माची ॥ २ ॥
गौळिये नांदती गोधनाचे कळप ।
त्यामाजि स्वरूप कृष्णमूर्ति ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्यान गोपाळ आमुचा ।
आतां जन्म कैचा भक्तजना ॥ ४ ॥
परेसि परता न कळे पैं – संत निवृत्तीनाथ अभंग