पांडुरंग हरि माजी भक्तजन – संत निवृत्तीनाथ अभंग


पांडुरंग हरि माजी भक्तजन ।
कैसें वृंदावन शोभतुसे ॥ १ ॥
ब्रह्मादिक ठेले विमानें अंबरीं ।
काला तो गजरीं पंढरिये ॥ २ ॥
सनकादिक देव देहुढापाउलीं ।
गोपाळ वांकुली दाविताती ॥ ३ ॥
पुंडलिका नाचे देवमुनी सर्व ।
भीमातीरीं देव प्रगटले ॥ ४ ॥
ज्ञानदेव सोपान विसोबा खेंचर ।
नरहरि सोनार नाचताती ॥ ५ ॥
निवृत्ति मुक्ताई चांगदेव गाढा ।
हरिचा पवाडा झेलिताती ॥ ६ ॥


पांडुरंग हरि माजी भक्तजन – संत निवृत्तीनाथ अभंग