पंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण – संत निवृत्तीनाथ अभंग
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा ।
परिमाण पैठा आत्माराम ॥१॥
तें रूप साजिरें चतुर्भुजवेष ।
वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥२॥
सिद्धीचें साधन चिंतामणि धन ।
कल्पवृक्ष घन वसते जेथें ॥३॥
निवृत्तिचें मूळ गोपाळ सकळ ।
साधक दयाळ हरि होय ॥४॥
पंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण – संत निवृत्तीनाथ अभंग