पाहतां साधन विठ्ठलकीर्तन – संत निवृत्तीनाथ अभंग
पाहतां साधन विठ्ठलकीर्तन ।
भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥
विठ्ठल सधर भिवरा तें नीर ।
नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥
शिवसुरवर चिंतिती सुस्वर ।
कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥
निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान ।
मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥