पंढरीये चोख रूपडें अशेख – संत निवृत्तीनाथ अभंग


पंढरीये चोख रूपडें अशेख ।
भीमातीरीं देख पुण्यभूमी ॥ १ ॥
आदिपीठ देव ब्रह्म हें स्वयमेव ।
पुंडलिक भाव प्रगटला ॥ २ ॥
जन हें कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ ।
कीर्तनीं कळीकाळ दूरी ठाये ॥ ३ ॥
नाम हें विठ्ठल नलगे पैं मोल ।
नित्यता सकळ पांडुरंग ॥ ४ ॥
त्रिविधताप पाप तें जिंतील अमूप ।
मुरतील संकल्प एक्या नामें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे धन्य कीर्तन जो करी ।
सर्वत्र चराचरीं बोलियेलें ॥ ६ ॥


पंढरीये चोख रूपडें अशेख – संत निवृत्तीनाथ अभंग