नित्य हरिकथा नित्य नामावळी – संत निवृत्तीनाथ अभंग
नित्य हरिकथा नित्य नामावळी ।
वैष्णवांचे कुळीं धन्य जन्म ॥ १ ॥
म्हणोनि पंढरी उपजवावें संसारीं ।
प्रत्यक्ष श्रीहरी तीरीं उभा ॥ २ ॥
नित्यता दिवाळी नाहीं तेथें द्वैत ।
नित्यता अच्युत तिष्ठतसे ॥ ३ ॥
निवृत्ति सादर विष्णुमय सार ।
विठ्ठल आचार पंढरिये ॥ ४ ॥
नित्य हरिकथा नित्य नामावळी – संत निवृत्तीनाथ अभंग