नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध – संत निवृत्तीनाथ अभंग

नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध ।
जन वन बोध ब्रह्मरसें ॥ १ ॥
तें मेघःशाममूर्ति स्वरूप गोजिरी ।
गोकुळींची चोरी करि कृष्ण व २ ॥
मुद्दल शामळ नित्यता अढळ ।
अखंड अचळ स्वरूप ज्याचें ॥ ३ ॥
निवृत्ति पुरता गुरु विवरण ।
गयनीची खूण आगमरूपें ॥ ४ ॥

नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध – संत निवृत्तीनाथ अभंग