निरशून्य बिंबी आकार पाहतां – संत निवृत्तीनाथ अभंग


निरशून्य बिंबी आकार पाहतां ।
आपण तत्त्वता हरि एकु ॥१॥
तें रूप साबडे कृष्णा माजींवडे ।
सोंवळें उघडें शौच सदा ॥२॥
तेथें वर्ण व्यक्ति कल्पना हरपती ।
मनाच्या खूंटती गती जेथें ॥३॥
निवृत्ति नितंब सोवळा स्वयंभ ।
प्रकाशलें बिंब चहूंकडे ॥४॥


निरशून्य बिंबी आकार पाहतां – संत निवृत्तीनाथ अभंग