निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य – संत निवृत्तीनाथ अभंग


निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य ।
प्रकाश संपूर्ण तया ब्रह्मा ॥१॥
ऐसें रूप पाहा क्षरे दिशा दाहा ।
सर्वभावें मोहा एका कृष्णा ॥२॥
नित्यता अढळ नित्यपणें वेळे ।
विकाश आकळे नित्य तेजें ॥३॥
रूपस सुंदर पवित्राआगर ।
चोखाळ साकार पवित्रपणें ॥४॥
नेणें हें विषय आकार न माये ।
विकार न साहे तया रूपा ॥५॥
निवृत्ति तत्पर कृष्ण हा साकार ।
ॐतत्सदाकार हरि माझा ॥६॥


निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य – संत निवृत्तीनाथ अभंग