निर्दोषरहित सर्व गुणीं हेत – संत निवृत्तीनाथ अभंग
निर्दोषरहित सर्व गुणीं हेत ।
द्वैत विवर्जित अरूप सदां ॥१॥
तें रूप स्वरूप कृष्ण बाळलीला ।
माजि त्या गोपाळा सदा वसे ॥२॥
गुणागुणी धीट वासना अविट ।
तद्रूप प्रगट निरंजन ॥३॥
विकार विवर्जित विवरण सोपे ।
अकार पैं लोपे एका नामें ॥४॥
निःसंदेह छंद वासनेचा कंद ।
ब्रह्माकार भेद नाहीं सदा ॥५॥
निवृत्ति परिवार ब्रह्मरूप गोकुळीं ।
वृंदावन पाळी यमुनातटीं ॥६॥
निर्दोषरहित सर्व गुणीं हेत – संत निवृत्तीनाथ अभंग