निरालंब सार निर्गुण विचार – संत निवृत्तीनाथ अभंग
निरालंब सार निर्गुण विचार ।
सगुण आकार प्रगटला ॥१॥
तें रूप सुंदर शंखचक्रांकित ।
शोभे अनंत यमुनातटीं ॥२॥
अपार उपाय आपणचि होय ।
सिद्धीचा न साहे रोळु सदा ॥३॥
सर्व हें घडलें कृष्णाचें सानुलें ।
घटमठ बुडाले इये रूपीं ॥४॥
सर्वसुखमेळे नामाकृती वोळे ।
सिद्धिचे सोहळे कृष्णनामीं ॥५॥
निरालंब सार निर्गुण विचार – संत निवृत्तीनाथ अभंग