निरालंब देव निराकार – संत निवृत्तीनाथ अभंग


निरालंब देव निराकार शून्य ।
मनाचेंही मौन हारपलें ॥ १ ॥
तें रूप साबडें शंखचक्रांकित ।
यशोदा तें गात कृष्णनाम ॥ २ ॥
मौनपणें लाठें द्वैत हें न साहे ।
तें नंदाघरीं आहें खेळेमेळें ॥ ३ ॥
निवृत्ति आकार ब्रह्म परिवार ।
गोकुळीं साकारमूर्ति ब्रह्म ॥ ४ ॥


निरालंब देव निराकार – संत निवृत्तीनाथ अभंग