निरालंब बीज प्रगटे – संत निवृत्तीनाथ अभंग
निरालंब बीज प्रगटे सहज ।
तो गौळियांचें काज करी कृष्ण ॥१॥
हरि हा सांवळा वेधिलिया बाळा ।
माजि त्या गोपाला गायी चारी ॥२॥
वंदिती सुरगण ब्रह्मादिक चरण ।
तो यशोदेसि स्तन मागे हरि ॥३॥
निवृत्तीचें ध्यान मनाचें उन्मन ।
योगिया जीवन हरि माझा ॥४॥
निरालंब बीज प्रगटे – संत निवृत्तीनाथ अभंग