निराळ निरसी जीवशीवरसीं – संत निवृत्तीनाथ अभंग
निराळ निरसी जीवशीवरसीं ।
सर्व ब्रह्म समरसीं वर्तें एक ॥ १ ॥
तें रूप परिकर कृष्णमूर्ति ठसा ।
गोपिकाकुंवासा नंदाघरीं ॥ २ ॥
संसाराचें तारूं ठाणमाण दिसे ।
शाम प्रभावसे तये ब्रह्मीं ॥ ३ ॥
निवृत्ति घनदाट कृष्ण घनःश्याम ।
योगी जनाध्यान नित्यरूपें ॥ ४ ॥
निराळ निरसी जीवशीवरसीं – संत निवृत्तीनाथ अभंग