निराकृती धीर नैराश्य विचार – संत निवृत्तीनाथ अभंग
निराकृती धीर नैराश्य विचार ।
परिपूर्ण साचार वोळलासे ॥ १ ॥
तें रूप रूपस सुंदर सुरस ।
तो पूर्ण प्रकाश गोकुळीं रया ॥ २ ॥
नानारूप हरपे दृश्य द्रष्टा लोपे ।
तो प्रत्यक्ष स्वरूपें नंदाघरी ॥ ३ ॥
निवृत्ति सादर निराकार अंकुर ।
साकार श्रीधर गोपवेष ॥ ४ ॥
निराकृती धीर नैराश्य विचार – संत निवृत्तीनाथ अभंग