नेणती महिमा ब्रह्मादिक भद्रा – संत निवृत्तीनाथ अभंग


नेणती महिमा ब्रह्मादिक भद्रा ।
आणि ते महेंन्द्र नानस्थानी ॥१॥
तें रूप खेळत गौळियांच्या संगे ।
पुंडलिका मागे भीमातीरी ॥२॥
उत्पत्ति उलथा न चले तो मार्ग ।
दुजियाचा संग नाहीं ज्यासी ॥३॥
निवृत्ति प्रगट गुरुमंत्र फळद ।
गोपाळ विद्नद ब्रह्म सेवी ॥४॥


नेणती महिमा ब्रह्मादिक भद्रा – संत निवृत्तीनाथ अभंग