नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं – संत निवृत्तीनाथ अभंग

नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं ।
दुजियाची गोष्टी नाहीं तेथें ॥१॥
तें रूप सुंदर देवकी उदरीं ।
वसुदेव घरीं कृष्ण माझा ॥२॥
ब्रह्मांडकडवा मनाचा वोणवा ।
साधितां राणिवा हारपती ॥३॥
निवृत्ति सुंदर कृष्णरूप सेवी ।
गयनीगोसावी उपदेशिलें ॥४॥

नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं – संत निवृत्तीनाथ अभंग