नाहीं यासि गोत नाही यासी कूळ – संत निवृत्तीनाथ अभंग


नाहीं यासि गोत नाही यासी कूळ ।
शेखीं आचारशीळ कोण म्हणे ॥ १ ॥
बाळरूपें हरि गोकुळीं लोणी चोरी ।
त्या यशोदा पाचारी थान द्यावया ॥ २ ॥
सोंवळा हरि वागवी शिदोरी ।
तो गोपालांच्या करी काला देतु ॥ ३ ॥
निवृत्ति संपूर्ण काला देतु जाण ।
ब्रह्मसनातन गोकुळींचें ॥ ४ ॥


नाहीं यासि गोत नाही यासी कूळ – संत निवृत्तीनाथ अभंग