नाहीं त्या आचारु सोंविळा – संत निवृत्तीनाथ अभंग
नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु ।
गोकुळीं साचारु अवतरला ॥ १ ॥
गाई चारी हरी गोपवेष धरी ।
नंदाचा खिलारीं ब्रह्म झालें ॥ २ ॥
ध्याताति धारणें चिंतिताती मौन्यें ।
योगियांची मनें हारपति ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें तें वसुदेवकुळीं ।
अवतार गोकुळीं घेतलासे ॥ ४ ॥
नाहीं त्या आचारु सोंविळा – संत निवृत्तीनाथ अभंग