नाहीं हा आकार नाहीं हा – संत निवृत्तीनाथ अभंग


नाहीं हा आकार नाहीं हा विकार ।
चतुर्भुज कर हरि माझा ॥१॥
हरिरूप पै जप हरिहररूप ।
गौळियांचें रूप सहज कृष्ण ॥२॥
हरिरूप घरीं सोळासहस्त्र नारी ।
तो बाळ ब्रह्माचारी गाई राखे ॥३॥
निवृत्ति रोकडे ब्रह्म माजिवडें ।
तो यशोदे पुढें लोणी मागे ॥४॥


नाहीं हा आकार नाहीं हा – संत निवृत्तीनाथ अभंग