नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी – संत निवृत्तीनाथ अभंग


नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी ।
आनंदाची सृष्टि तया जाली ॥ १ ॥
घेरे नाम्या कवळु आनंदाचा होसी ।
तुजमाजि निवासि हरि आहे ॥ २ ॥
नामा पसरी मुख आनंदला तृप्त ।
कवळु पूर्णभरित हरिराज ॥ ३ ॥
निवृत्तीने सेविला कवळु हा हरि ।
तूंचि चराचरीं दिससी आम्हां ॥ ४ ॥


नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी – संत निवृत्तीनाथ अभंग