मातेचें बाळक पित्याचें जनक – संत निवृत्तीनाथ अभंग
मातेचें बाळक पित्याचें जनक ।
गोत हें सम्यक हरि आम्हां ॥ १ ॥
मुकुंद केशव हाचि नित्य भाव ।
हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥ २ ॥
पूर्वज परंपरा तें धन अपारा ।
दिनाचा सोयिरा केशिराज ॥ ३ ॥
निवृत्तीचे गोत कृष्ण नामें तृप्त ।
आनंदाचें चित्त कृष्णनामें ॥ ४ ॥
मातेचें बाळक पित्याचें जनक – संत निवृत्तीनाथ अभंग