मनाची वासना मनेंचि – संत निवृत्तीनाथ अभंग


मनाची वासना मनेंचि नेमावी ।
सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥ १ ॥
आपेंआप निवेल आपेंआप होईल ।
विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥ २ ॥
साधितां मार्ग गुढ वासना अवघड ।
गुरुमार्गी सुघड उपरती ॥ ३ ॥
निवृत्ति वासना उपरति नयना ।
चराचर खुणा हरि नांदे ॥ ४ ॥


मनाची वासना मनेंचि – संत निवृत्तीनाथ अभंग