मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद – संत निवृत्तीनाथ अभंग
मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद ।
रूपरस गोविंद गुणनिधी ॥ १ ॥
तें रूप सुरवर सेविती अरुबार ।
नित्यता सविचार भोगिताती ॥ २ ॥
गौळिया गोजिरें दैवत साचारें ।
नंदासि एकसरे प्रेम देत ॥ ३ ॥
निवृत्ति निवाला प्रेमरसें धाला ।
सर्व सुख डोळा हरिकृष्ण ॥ ४ ॥
मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद – संत निवृत्तीनाथ अभंग