खुंटलें तें मन तोडियेली गति – संत निवृत्तीनाथ अभंग
खुंटलें तें मन तोडियेली गति ।
वेळु तो पुढती मोडियला ॥ १ ॥
जाहालें उन्मन विरालें तें मन ।
श्रीरामचरण पुरे आम्हां ॥ २ ॥
गेलें मन रामीं निष्काम कल्पना ।
बुडाली वासना तिये डोही ॥ ३ ॥
धन्य ते चरण नित्यता स्मरण ।
अखंडसंपन्न प्रेम देतु ॥ ४ ॥
अमृत कुपिका अमृताचा झरा ।
पटु येकसरा वाहातुसे ॥ ५ ॥
निवृत्तीची वृत्ति प्रेमेंचि डुल्लत ।
नमनेम निश्चित रामपायीं ॥ ६ ॥
खुंटलें तें मन तोडियेली गति – संत निवृत्तीनाथ अभंग