कारण परिसणा कामधाम – संत निवृत्तीनाथ अभंग
कारण परिसणा कामधाम नेम ।
सर्वाआत्माराम नेमियेला ॥१॥
तें रूप सुंदर सर्वागोचर ।
कृष्ण परिकर गोपवेषे ॥२॥
वेदादिक कंद ॐकार उद्बोध ।
साकार प्रसिद्ध सर्वाघटीं ॥३॥
निवृत्ति म्हणे धाम कृष्ण हा परम ।
सौख्यरूपें सम वर्ततसे ॥४॥
कारण परिसणा कामधाम – संत निवृत्तीनाथ अभंग