काळवेष दुरी काळचक्र करीं – संत निवृत्तीनाथ अभंग


काळवेष दुरी काळचक्र करीं ।
बाह्य अभ्यंअती हरि नांदे ॥ १ ॥
सर्वत्र श्रीकृष्ण नंदाघरीं जाला ।
कृष्णें काला केला गोपवेषें ॥ २ ॥
गोपाळ संवगडे खेळे लाडेकोडे ।
यशोदेमाये पुढें छंदलग ॥ ३ ॥
निवृत्तिम्हणे तो स्वामी सकळांचा ।
दिनकाळ वाचा कृष्ण जपों ॥ ४ ॥


काळवेष दुरी काळचक्र करीं – संत निवृत्तीनाथ अभंग