काला तंव निकटी श्रीरंग जाले – संत निवृत्तीनाथ अभंग


काला तंव निकटी श्रीरंग जाले ।
भक्तांचे सोहळे पुरविले ॥ १ ॥
वेणुनादीं काला एकत्र पैं जाला ।
दहींभात झेलाझेलीतु देव ॥ २ ॥
तोचि कवळु घेत नामयासी देतु ।
ज्ञानासी भरीतु पूर्णतोषें ॥ ३ ॥
निवृत्ति सोपान कालवले कालीं ।
खेचराची धाली ताहान भूक ॥ ४ ॥


काला तंव निकटी श्रीरंग जाले – संत निवृत्तीनाथ अभंग