ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें – संत निवृत्तीनाथ अभंग
ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें ।
एका नामें होणें चतुर्भुज ॥ १ ॥
तें रूप वैकुंठ भोगिती गोकुळीं ।
नंदाचिये कुळीं बाळकृष्ण ॥ २ ॥
न संपडे ध्यानीं लावितां उन्मनी ।
तो गोपाळाचे कानीं सांगे मातु ॥ ३ ॥
निवृत्ति अरुवार कृष्णरूपी सेवी ।
मन ठाणदिवी ह्रदयामाजी ॥ ४ ॥
ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें – संत निवृत्तीनाथ अभंग