ज्या रूपाकारणें देव वोळंगणे – संत निवृत्तीनाथ अभंग


ज्या रूपाकारणें देव वोळंगणे ।
योगी गुरुखुणें सेविताती ॥ १ ॥
ते रूप गोकुळीं गोपाळांचे मेळीं ।
अखंड त्यामेळीं खेळतुसे ॥ २ ॥
ब्रह्मांड कडोविकडी ब्रह्मांड घडी ।
या योग परवडी हरपती ॥ ३ ॥
निवृत्तीचे धन ब्रह्म हें रोकडें ।
गौळणी त्यापुढें खेळविती ॥ ४ ॥


ज्या रूपाकारणें देव वोळंगणे – संत निवृत्तीनाथ अभंग