ज्या नामें अनंत न कळे संकेत – संत निवृत्तीनाथ अभंग

ज्या नामें अनंत न कळे संकेत ।
वेदाचाही हेत हारपला ॥१॥
तें रूप सानुलें यशोदे तान्हुलें ।
भोगिती निमोले भक्तजन ॥२॥
अनंत अनिवार नकळे ज्याचा पार ।
जेथें चराचर होतें जातें ॥३॥
निवृत्तिसंकेत अनंताअनंत ।
कृष्णनामें पंथ मार्ग सोपा ॥४॥

ज्या नामें अनंत न कळे संकेत – संत निवृत्तीनाथ अभंग