जेथुनीया परापश्यंती वोवरा – संत निवृत्तीनाथ अभंग


जेथुनीया परापश्यंती वोवरा ।
मध्यमा निर्धारा वैखरी वाहे ॥ १ ॥
तें रूप सुंदर नाम तें श्रीधर ।
जेणें चराचर रचियेलें ॥ २ ॥
वेदाचें जन्मस्थान वेदरूपें आपण ।
तो हा नारायण नंदाघरी ॥ ३ ॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ ।
गोपिकांचें हित करि माझा ॥ ४ ॥


जेथुनीया परापश्यंती वोवरा – संत निवृत्तीनाथ अभंग