जेथुनि उद्गारु प्रसवे ॐ – संत निवृत्तीनाथ अभंग


जेथुनि उद्गारु प्रसवे ॐकारु ।
तोचि हा श्रीधरु गोकुळीं वसे ॥१॥
जनकु हा जनाचा जीवलगु साचा ।
तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥
नमाये वैकुंठी योगियांचे भेटी ।
पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥
निवृत्ति म्हणे देवा म्हणविता हे रावो ।
तो सुखानुभवो यादवांसी ॥४॥


जेथुनि उद्गारु प्रसवे ॐ – संत निवृत्तीनाथ अभंग