जेथें रूप रेखा नाहीं गुण – संत निवृत्तीनाथ अभंग
जेथें रूप रेखा नाहीं गुण देखा ।
चिदाकाश एका आपतत्त्व ॥१॥
तें रूप गोजिरें कृष्ण रूपें सांग ।
यशोदेचा पांग हरियेला ॥२॥
जेथें रजतम नाहीं तें निःसीम ।
अपशम दम पूर्णघन ॥३॥
निवृत्ति सार पा ब्रह्मसुख घन ।
सर्व जनार्दन गोपवेषें ॥४॥
जेथें रूप रेखा नाहीं गुण – संत निवृत्तीनाथ अभंग