जेथें रूप रेखा ना आपण आसका – संत निवृत्तीनाथ अभंग
जेथें रूप रेखा ना आपण आसका ।
सर्व रूपें देखा हरि माझा ॥ १ ॥
तें रूप गोजिरें नंदाघरीं असे ।
जनीवनीं दिसे गोपिकांसि ॥ २ ॥
नादभेद कळा जेथें भेद नुठी ।
ब्रह्मरूपें तुष्टि अवघी होय ॥ ३ ॥
निवृत्ति जन जन वन देख ।
आत्मरूपभाव ब्रह्म जाला ॥ ४ ॥
जेथें रूप रेखा ना आपण आसका – संत निवृत्तीनाथ अभंग