जयामाजी दीक्षा हारपोनि – संत निवृत्तीनाथ अभंग


जयामाजी दीक्षा हारपोनि जाये ।
द्वैत हेंही ठाये दुजेपणें ॥१॥
तें रूप रोकडें दिसे चहूंकडे ।
गोपाळ संवगडे खेळताती ॥२॥
उपराति योगियां तितिक्षा हारपे ।
मायकार लोपे कृष्णध्यानें ॥३॥
निवृत्ति तप्तर सर्व हा श्रीधर ।
मनाचा विचार हारपरला ॥४॥


जयामाजी दीक्षा हारपोनि – संत निवृत्तीनाथ अभंग